Saturday, April 25, 2015

ब्रेकअप च्या आधी अणि ब्रेकअप च्या नंतर

ब्रेकअप च्या आधी अणि ब्रेकअप च्या नंतर....
तेव्हा रोज सकाळी उठल्यावर मोबाईल वर तुझा मेसेज असायचा....
मेसेज तुझा बघुन माझ्या चेहऱ्यावर आनंद उमटायचा...
पण आता रोज सकाळी मीच मेसेज करतो....
आणि वाट बघतो रिप्लाई येण्याची....
जास्त नाही पण खुप बदलत चलालय हे अंतर...
ब्रेकअप च्या आधी अणि ब्रेकअप च्या नंतर....
तेव्हा आपण दोघ ही आपापल्या कामात व्यस्त राहायचो...
तरीही वेळात वेळ काढून दिवसतून एक तरी कॉल व्हायचा...
जास्त नव्हते बोलने आपले, पण जे बोलायचो ते खुप...
आता मी कॉल केला तर तू घेत नाहीस अणि स्वतहुँ तर करतच नाहीस...
जास्त नाही पण खुप बदलत चलालय हे अंतर...
ब्रेकअप च्या आधी अणि ब्रेकअप च्या नंतर....
तेव्हा रात्रि उशिरा पर्यन्त मेसेज वर आपले बोलने व्हायचे...
भिंतीवरील घड्याळ मधल्या टाइम चे भान न राहयचे...
त्या प्रेमळ गप्पा करने अणि प्रेमाचे ते स्वप्न बघने..
आता मात्र मी एकटाच स्वताशी गप्पा करतो...
आणि ते पाहिलेले सर्व स्वप्न तुटताना बघत मरतो...
जास्त नाही पण खुप बदलत चलालय हे अंतर...
ब्रेकअप च्या आधी अणि ब्रेकअप च्या नंतर....
वेगळे तर होणार च होतो आपण एक दिवस...
पण ही वेळ योग्य नव्हती वेगळे होण्याची...
अचानक माझ्या आयुष्यातून दूर जाण्याची...
थोडा वेळ दिला असतास मला सवरायला...
मनी माझ्या दाटलेल्या हूंदक्यांना आवरायला...
जास्त नाही पण खुप बदलत चलालय हे अंतर...
ब्रेकअप च्या आधी अणि ब्रेकअप च्या नंतर....
~निलहर्ष...एक हरवलेल नाव~

No comments:

Post a Comment